अमरावती जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव गंभीर बनला आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यांत 19,366 नागरिकांना कुत्र्याने चावा घेतला असून, एकाचा मृत्यूही झाला आहे. दररोज सरासरी 70 लोक कुत्रा चावल्याने जखमी होत आहेत. सुमारे 20 हजार भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक भयभीत असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.