अमरावती जिल्ह्यातील घाटलाडकी-वणी रस्त्याच्या रखडलेल्या डांबरीकरणाविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने घाटलाडकी फाटा येथे जोरदार चक्काजाम आंदोलन छेडले. रस्त्यावरील गिट्टीमुळे वाढलेले अपघात, वाहनांचे नुकसान आणि नागरिकांची होत असलेली गैरसोय यावर संतप्त शिवसैनिकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको केला.आंदोलन उग्र होताच पोलिसांनी हस्तक्षेप करून अनेक शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.