अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील ऐतिहासिक शंकर पटावर तरुणींनी बैल जोडी हाकलत मैदान गाजवल्याचे पाहायला मिळाले.तळेगाव दशासर येथील शंकर पटाच्या शेवटच्या दिवशी महिलांनी पटावर बैलजोडी हाकलत सगळ्यांची लक्ष वेधले आहे. या पटामध्ये प्रचंड वेगाने पटाचे अंतर पार करणाऱ्या बैलांची धुरा सांभाळत नवतरुणी स्वतःला बलवान असल्याचे सिद्ध केले.