राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आज चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत असून पहिल्या श्रावण सोमवार निमित्ताने चंद्रपुरात असलेल्या मोठी शिवलिंगाची रुद्राभिषेक पूजा करणार आहेत. दुपारी ३ वाजता त्या चंद्रपुरात पूजेसाठी येणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.