मावळ तालुक्यातील किल्ले विसापूरच्या उभ्या कातळात आणि अवघड ठिकाणी कोरलेले एक अपरिचित असं प्राचीन भुयार आढळले आहे. मावळातील दुर्ग-संवर्धन करणाऱ्या "सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठानला" यांनी या भुयाराचा शोध घेतला आहे. हे भुयार कोरीव असून नेमके कशासाठी खोदले गेले असेल? कोणी खोदले असेल? असे कुतहूल निर्माण झाले आहे. हे भुयार इतिहास अभ्यासकांना संशोधन करण्यासाठी मोठी पर्वणी ठरणारे आहे. मावळातील विसापूर गडाच्या पायथ्यालगत असलेल्या मालेवाडी याठिकाणाहून दुर्गसेवक हे आडवाटेने विसापूर गडावर जात असताना त्यांना हे प्राचीन आणि अपरिचित भुयार आढळले.