हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यात मध्य रात्री 1. 37 वाजता भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिक भयभयीत होऊन घराबाहेर पडले.या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल एवढी भुमापक केंद्रात नोंद झाली आहे.नांदेडमध्ये जमीन कंप पावल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. मागच्या काही वर्षांपासून जमिनीतून गूढ आवाज येत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.