प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समुहाकडून साईचरणी पाच कोटींची देणगी देण्यात आली. साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचेकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनंत अंबानी साईंच्या दरबारी लीन झाले होते. साईबाबांच्या धुपारतीला उद्योगपती अनंत अंबानी यांनी उपस्थिती लावली आहे.