सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या आंधळी येथे भारनियमाने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीचं आंदोलन केलं आहे.बॅटरी आणि इन्वर्टर घेऊन या ग्रामस्थांनी धरणे आंदोलन केलं आहे.आंधळी गावातील वाड्या वस्त्यांवर काही दिवसांपासून सायंकाळ नंतर भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत.