यवतमाळ तालुक्यातील भाम राजा येथील इंडियन बँकेचे अधिकारी-कर्मचारी शेतकऱ्यांना थकीत कर्ज भरणा करण्यासाठी वारंवार तगादा लावत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कुणाल जतकर यांच्या नेतृत्वात बँकेला कुलूप लावलं. सध्या जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत असताना बँक अधिकारी कर्मचारी कर्ज वसुलीसाठी तगादा लावत असल्याचं त्यांनी म्हटलं.