कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड निश्चित होताच रोहा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या विजय उत्सवात कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला.