समाजसेविका अंजली दमानिया यांनी पार्थ पवार आणि अमेडिया एंटरप्राइजेसचे नाव एफआयआरमध्ये तात्काळ समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. मर्यादित दायित्व भागीदारीत (LLP) फसवणूक झाल्यास भागीदारांवर अमर्यादित जबाबदारी येते, असे दमानिया यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवारचा एफआयआरमध्ये समावेश गरजेचा असल्याचे त्या म्हणाल्या.