अंजली दमानिया यांनी अजित पवारांना गंभीर इशारा दिला आहे. पार्थ, सुनेत्रा आणि अजित पवारांच्या कंपन्या तसेच त्यांच्या जमिनींचे खुलासे करणार असल्याचे दमानिया म्हणाल्या. बाळगंगा आणि कोंडाणे धरणातील आरोपांमध्ये आरोपपत्र दाखल झाले होते; मित्र देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावर प्रकरणे बंद झाली, ती पुन्हा उघडल्यास अजित पवारांना मोठे परिणाम भोगावे लागतील, असे दमानियांचे म्हणणे आहे.