येवला तालुक्यातील ऐतिहासिक अंकाई किल्ला सध्या हिरवाईने नटलेला असून त्याचं सौंदर्य पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरत आहे. पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात विराजमान झालेला हा किल्ला, इतिहासप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी पर्वणी ठरत आहे. पावसाळी वातावरणामुळे किल्ल्यावर आल्हाददायक थंडी, धुके आणि निसर्गसौंदर्य अनुभवता येत असल्याने पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.