एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झालाय. दादा गटाच्या सूरज चव्हाण यांच्याकडून हा दुसरा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. यामध्ये आघोरी पूजा केल्याचा या मंत्र्यावर आरोप आहे. नुकताच ठाकरे गटाचे वसंत मोरे यांनी निवडणुकीपूर्वी गोगावलेंनी अघोरी पूजा केल्याचा आरोप करत एक व्हिडीओ समोर आणला होता.