मिरा भाईंदरमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. रीना मेहता कॉलेज, एल. पी. रावल कॉलेज आणि सेंट विल्फ्रेड स्कूलमधील (स्काऊट गाईडसह) एकूण ३०० ते ३५० विद्यार्थी-विद्यार्थिनी या रॅलीत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी परिसरात प्रभातफेरी काढून अंमली पदार्थांच्या विरोधात विविध पोस्टर्स, बॅनर्स आणि स्लोगनद्वारे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.