अंबाजोगाई शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेला शुक्रवार पासून सुरुवात झाली असून आज सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद यांच्या वतीने ही संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.