रत्नागिरीत नगर परिषदेमार्फत अतिक्रमण हटाव मोहिम सुरु करण्यात आली असून सकाळी साळवी स्टॉप येथून या अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. नगर परिषदेचे कर्मचारी आणि अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते.