पुण्याच्या भोरमधील उत्रौली गावच्या कुंभारवाड्यात आषाढी बैलपोळ्याचे वेध लागले आहेत. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढी बैलपोळा सणासाठी कुंभार कुटुंबांची मातीपासून बैल बनवून ते रंगविण्याची लगबग सुरू आहे. घरोघरी कुंभार मातीचे बैल बनविण्यात आणि त्यावर रंगाचा शेवटचा हात मारण्यात दंग आहेत.