लोणावळ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वळवण धरणातील पाणीसाठा ९०.२० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे टाटा पॉवर प्रशासनाकडून इंद्रायणी नदीपात्रात १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.पावसाचा जोर आणि धरणातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.