ॲप्पलने आयफोन पॉकेट नावाचे एक नवीन उत्पादन लाँच केले आहे. हे एक 3D विणलेले स्ट्रेचेबल कापड आहे, ज्यामध्ये आयफोन किंवा छोटे गॅझेट ठेवता येतात. त्याची किंमत ₹13,000 ते ₹20,000 पर्यंत आहे. इतक्या किमतीमुळे सोशल मीडियावर हे उत्पादन चर्चेचा विषय बनले आहे.