सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात, महाबळेश्वर-पाचगणी लगत असलेल्या पसरणी घाट परिसरात एका जिद्दी शेतकऱ्याने अशक्य वाटणारे स्वप्न साकार केले आहे. महाराष्ट्राचा मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात फुललेली सफरचंद बाग सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.