परंडा तालुक्यातील कौडगाव येथील महारुद्र दत्तू पाडुळे आणि रत्नाकर दत्तू पाडुळे या दोन सख्ख्या भावांची महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली आहे. या अभूतपूर्व यशानिमित्त संपूर्ण कौडगाव ग्रामस्थांच्या वतीने दोघांची गावातून वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.