अर्जुन खोतकर यांनी सीसीआय केंद्रावरील कर्मचाऱ्याला शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासावरून खडसावले. रात्री उशिरा इंग्रजीमध्ये रद्द झालेले संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठवल्याने, त्यांना भाड्याने आणलेल्या ट्रॅक्टरचे नुकसान होत होते. शेतकऱ्याला इंग्रजी समजत नाही, त्यामुळे त्रास देऊ नका, अशा सूचना खोतकरांनी कर्मचाऱ्याला दिल्या.