नंदुरबार बाजार समितीत ओव्याच्या आवकाला सुरुवात झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामात ओव्याची पेरणी केली जाते, मात्र यावर्षी आवक उशिराने सुरू झाली आहे. दररोज २०० ते २५० क्विंटल आवक येत आहे. परंतु ओव्याला ११ हजारांपासून ते १६ हजारांपर्यंतचं दर मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसात ओव्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रमध्ये फक्त नंदुरबार जिल्ह्यात हे पीक घेतलं जातं.