रत्नागिरीतील लांजामध्ये पावसाची जोरदार एण्ट्री झाली आहे. रात्रीपासूनच जिल्ह्यातील विविध भागात पावसाची रिमझिम सुरू आहे. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या या पावसामुळे आशा पल्लवीत झाल्या आहेत. 25 जूनपर्यंत कोकणात मॉन्सूनच्या दमदार सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.