धुळे शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी आणि प. पू. श्रीधर स्वामी महाराज यांच्या पवित्र चरणपादुकांचे धुळ्यात आगमन झालं. श्री समर्थ वाग्देवता मंदिरात या चरणपादुकांचे विधिवत पूजन आणि अभिषेक करण्यात आला.