गुहागरच्या किनारपट्टी भागात सिगल पक्षांचे थवे दिसू लागल्याने हिवाळ्याची चाहूल लागल्याचे स्पष झाले आहे.अचानक झालेल्या हवामान बदलामुळे नियमित वेळेपेक्षा यंदा सिगल उशीराने कोकण किनारपट्टीवर दाखल झाल्याची माहिती स्थानिक मच्छिमारांनी दिली आहे.गुहागरच्या समुद्र किनारपट्टीवर मोठ्या संख्येने सिगल पक्षांचे दर्शन होत आहे.