पेण शहरात भिक्खु संघाचे आगमन झाल्याने बौद्ध बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून रायगड जिल्हा अंतर्गत पेण तालुका शाखेच्यावतीने वाशी येथील लुंबिनी बुद्ध विहार येथे ७ ते १६ मार्चदरम्यान श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन महासभेचे रायगड जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले होते.