पुण्यातील कळस, गणेशनगर आणि बोपखेल परिसरात जाणूनबुजून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे यांनी केला आहे. कालच दुरुस्ती केलेली जलवाहिनी आज पुन्हा फुटल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.