खासदार अरविंद सावंत आणि वरळी पोलिसांमध्ये मध्यरात्री तडीपारीच्या नोटीसवरून जोरदार बाचाबाची झाली. ठाकरे सेनेच्या एका पदाधिकाऱ्याला दिलेल्या नोटीसमुळे सावंत संतप्त झाले. त्यांनी पोलिसांना पदाधिकाऱ्याची नेमकी चूक विचारली आणि कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली बेबंदशाही चालणार नाही असा सवाल केला. हा वाद रात्री उशिरापर्यंत सुरू होता.