आषाढी वारीत लाखो भक्तांना अहोरात्र दर्शन दिल्यानंतर, थकलेल्या विठ्ठलाला प्रक्षाल पूजा करण्यात आली. या पूजेत गरम पाणी, दही-दूध आणि आयुर्वेदिक काढाचा समावेश होता. भाविकांनी लिंबू आणि साखरेने देवाच्या पायांचा अभिषेक केला. नंतर, पंचामृत आणि केशर पाण्याने स्नान करून विठ्ठलाचे नित्यपूजन पुन्हा सुरू करण्यात आले. ही प्रक्षाल पूजा, अखंड उभे राहून थकलेल्या विठ्ठलाच्या आरोग्यासाठी केली जाते.