भाजप नेते आशिष शेलार यांनी उबाठा सेनेसोबतच्या आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, ज्यांनी तुमच्या "घरच्या व्यक्तींना" निवडणुकीत पराभूत करून घरी बसवले, त्यांच्याशीच तुम्ही आता युती केली आहे. सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याआधी, तुमच्याच लोकांना कोणी घरी बसवले, याचा विचार करा, असे शेलार यांनी म्हटले आहे.