भाजप नेते आशिष शेलार आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ट्विटरवर जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. काँग्रेसच्या दारात कुबड्यांसाठी उभा असलेल्या उबाठा गटावर शेलार यांनी टीका केली. यावर गायकवाड यांनी शेलारांना प्रत्युत्तर देत त्यांच्याच पक्षाला निवडणूक आयोगाच्या आधाराची गरज असल्याचे म्हटले. तसेच, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये जात असल्याचा मुद्दाही उपस्थित केला.