नांदेडमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारात व्यस्त झाले आहेत. मुदखेड शहरातील अरुंद अशा गल्लीत कॉर्नर सभा घेण्यासाठी ते रात्री कार्यकर्त्याच्या स्कुटरवरून सभा स्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी 'रामसिंग के स्कूटर मे बैठ के अंदर आया हू मै, रामसिंग मुझे बोला आजा मेरे गाडी मे बैठ जा' असे फिल्मी डॉयलॉग मारत प्रचाराला सुरुवात केलीय. त्यांचे हे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.