काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी MIM मध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. MIM कोण चालवतो हे सगळ्यांना माहीत आहे. अशोकराव चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचा आहे असं वक्तव्य आमदार चिखलीकर यांनी केलं होतं. त्याला आता खासदार अशोक चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे.