पश्चिम विदर्भातील वाशीम व अकोला जिल्ह्यात विस्तारलेले, 'पाणी देणार जंगल' अशी ओळख असलेले काटेपूर्णा अभयारण्य जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या अभयारण्यात असलेला जलाशय देशी-विदेशी पाणपक्ष्यांचे प्रमुख आश्रयस्थान असून दरवर्षी हिवाळ्यात विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी येथे मोठ्या संख्येने दाखल होतात.