डिसेंबर महिना खगोलप्रेमींसाठी नेहमीच उत्सुकतेचा असतो. या काळात सौरमंडलातील विविध खगोलीय घडामोडी आणि तारकासमूहांच्या कक्षांतील बदलांमुळे आकाशात अनेक उल्कावर्षाव पाहायला मिळतात.त्याचाच एक भाग म्हणून १३ आणि १४ डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय उपखंडातील उत्तर गोलार्धात मिथुन तारकासमूहातील (जेमिनिड्स) उल्कावर्षावाचे मनोहारी दर्शन घडले.या दुर्मिळ खगोलीय घटनेचा अनुभव वाशीम जिल्ह्यातील खगोलप्रेमींनी घेतला. सलग दोन दिवस रात्री उशिरापर्यंत आकाशाचे बारकाईने निरीक्षण करून त्यांनी या उल्कावर्षावाची खगोलीय पर्वणी अनुभवली.