पुण्याच्या भोरमधील जिजामाता शाळेत विद्यार्थ्यांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. गणेशोत्सवाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने हा सामूहिक अथर्वशीर्ष पठण सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे संपूर्ण शाळा परिसर भक्तीमय आणि मांगल्याच्या वातावरणाने न्हाऊन गेला होता. विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची रुजवण व्हावी,