भिवंडी तालुक्यातील पडघा नजिकच्या बोरिवली गावात रात्रीपासून राष्ट्रीय तपास यंत्रणा एटीएस आणि ईडीच्या पथकांनी गावातील काही घरांमध्ये छापेमारी कारवाई सुरू केली आहे. दहशतवादी कृत्यात सहभागी कुख्यात साकिब नाचन याचं 28 जून रोजी निधन झाल्यानंतर गाव शांत झालं असं दिसत असतानाच पडघा नजिकचं बोरिवली गाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.