अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्त्यावर असलेलं एटीएम मशीन फोडून रोकड लांबवण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही (CCTV) फुटेज समोर आला असून यामध्ये चार चोरटे पळताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.