करमाळा तालुक्यातील भगतवाडी येथे हातात तलवार घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला जातोय. हातात तलवार घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सुभाष उर्फ अण्णा नारायण जाधव याच्याविरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुभाष उर्फ अण्णा नारायण जाधव याला करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस पुढील तपास करत आहेत.