नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहरातील चर्च व परिसरात आकर्षक आणि नेत्रदीपक सजावट करण्यात आली आहे. रंगीबेरंगी दिवे, तारे, फुलांची आरास तसेच प्रभु येशूच्या जन्मदृश्याची (क्रिब) उभारणी यामुळे संपूर्ण परिसर उत्सवी वातावरणात न्हालेला दिसत आहे.