राहाता शहरात गौराई पुजनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. काल गौराईचे थाटात आगमन झाल्यानंतर आज घरोघरी गोडधोड नैवेद्य दाखवण्यात आला. महिलांनी केलेल्या आकर्षक सजावटीतून सामाजिक संदेश देण्यावर भर दिला आहे.राहाता शहरातील सुवर्णा माळवे यांनी गौराईसमोर ग्रामीण भागातील विवाह सोहळ्याचा देखावा मांडला असून सुपारी फोडणे, साखरपुडा ते मुलीच्या पाठवणीपर्यंत सर्व प्रसंग कलात्मक पद्धतीने दाखवण्यात आले आहेत...गौराईभोवती नैसर्गिक फुलांनी सजवलेला सुंदर देखावा महिलांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. या थाटामाटात पार पडलेल्या गौराई पूजनासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याच दिसुन आलय.