निर्जला एकादशी निमित्त आळंदी मधल्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आलीय,रंगीबेरंगी फुलांच्या मनमोहक सजावटीमुळ मंदिर परिसरात प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळत आहे.मंदिरातील धार्मिक विधी, भजन-कीर्तन आणि हरिनामाच्या गजरान संपूर्ण आळंदी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे.