दीपावली आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे तब्बल आठ दिवस बंद असलेले लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव आजपासून पुन्हा पूर्ववत सुरू झाले आहेत. लिलावाच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात १४० वाहनांतून कांद्याची आवक झाली. यामध्ये अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यातून नवीन लाल कांद्याची ६१ वाहनांतून आवक झाली.