मनसे नेते अविनाश जाधव यांनी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांच्या एकजुटीची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांची लढाई अफजलखानाच्या फौजेसोबत असल्याचे ते म्हणाले. या संदर्भातील जागावाटप आणि युतीबाबतचा अंतिम निर्णय सन्माननीय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे घेतील, असेही जाधव यांनी स्पष्ट केले. सध्या काही जागांवर चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.