अविनाश जाधव यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात रस्त्यावरची लढाई एकत्रितपणे लढण्याची घोषणा केली आहे. महानगरपालिकेतील मागील अडीच ते तीन वर्षांतील गैरव्यवहारांचा पर्दाफाश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सत्तेवर आल्यास या गैरव्यवहारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.