शिवसेनेत आम्हाला विचारलं जात नाही. परस्पर निर्णय घेतले जातात. असं होणार असेल तर मग आम्ही 55-57 वर्षे जी काही शिवसेना या ठिकाणी रुजवली, वाढवली.. त्याची काय किंमत आहे? ज्या ठिकाणी किंमत नाही, तिथे राहण्याचा काही अर्थ नाही, अशा शब्दांत बबनराव घोलप यांनी नाराजी व्यक्त केली.