बच्चन कुटुंबात फॅशन आणि ग्लॅमरला नेहमीच महत्त्व दिले जाते. ऐश्वर्या राय बच्चन आणि श्वेता बच्चन या दोघीही त्यांच्या खास शैलीसाठी ओळखल्या जातात. मात्र, रॅम्प क्वीनचा किताब कोणाला मिळतो, हा प्रश्न कायम आहे. श्वेता बच्चनची रॅम्पवरील उपस्थिती अनेकदा दुर्लक्षित राहिली असली तरी, तिचा सोफिस्टिकेटेड अंदाज प्रेक्षकांची मने जिंकणारा ठरला आहे.