भाजपच्या बबनराव लोणीकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर बच्चू कडू यांनी लोणीकरांना थेट इशारा दिला आहे. लोणीकर आमच्या हातात आले तर सोडणार नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांवर बोलण्याची हिंमत येतेच कशी, असं म्हणत संताप व्यक्त केलाय.